पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याची काही वादांपासून सुटका होत नाहीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटण्यात मीडिया प्रतिनिधींशी गैरवर्तन करण्यात आलंय. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या बॉडीगार्ड्सनी मीडिया प्रतिनिधींना धक्काबुक्की केलीय. 



पाटणा सचिवालयाबाहेर हा सगळा प्रकार घडलाय. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि कुटुंबीय अडचणीत आलेत. या संदर्भात मीडिया प्रतिनिधींनी तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. 


या प्रश्नामुळे तेजस्वी यादव यांच्या बॉडीगार्ड्सचा तीळपापड झाला. त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी अरेरावी केली. तसंच त्यांना धक्काबुक्कीही केलीय. 
विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना तेजस्वी यादव तिथे उपस्थित होते. या घटनेनंतर तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते सुशील मोदी यांनी केलीय.