रुग्णालयात कोरोना रुग्णांचा डान्स व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये कोरोना रुग्ण सर्वकाही विसरुन डान्स करताना दिसतायत.
नवी दिल्ली : जगभरातील लाखो नागरिक कोरोनाशी लढत आहेत. पण कर्नाटकमध्ये असेही रुग्ण आहेत जे पॉझिटीव्ह असूनही रुग्णालयात मस्ती करताना दिसतायत. सोशल मीडियात या कोरोना रुग्णांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कोरोना रुग्ण सर्वकाही विसरुन डान्स करताना दिसतायत.
कर्नाटकच्या बेल्लोरीमधील एका रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. इथे कोविड १९ ची लक्षण दिसत नसली तरी अहवाल पॉझिटीव्ह आलेयत असे रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. यामध्ये कोरोना रुग्ण बेडजवळ डान्स करुन मस्ती करताना दिसत आहेत. कोरोनाला घाबरुन चालणार नाही, त्याला हरवाव लागेल हे या दोन्ही व्हिडीओतून शिकायला मिळतंय.
कोरोना रुग्णांचा हा उद्रेक पाहता आता देशभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येनं ११ लाखांचा आकडा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्याच्या घडीला देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.
आयसीएमआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी देशभरात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. देशात. सद्यस्थितीला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना फोफावताना दिसत आहे. हे एकंदर चित्र पाहता रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा आरोग्य यंत्रणांपुढं मोठी आव्हानं उभी करत असून नागरिकांनाही धास्ती देऊन जात आहे.