भारताच्या या भागात मामा आणि भाचीचे होते लग्न, तर या ठिकाणी आई झाल्यावरच होते लग्न
भारतातील विविध प्रथा...
मुंबई : जगभरात अशा अनेक प्रथा अशा आहेत. ज्या ऐकूण आपण हैराण होतो. परंपरा आणि भिन्न संस्कृती यासाठी भारत जगभर ओळखला जातो. जेवढे खाद्यपदार्थ व अनेक रूढी. तितकी राज्ये. अगदी छोट्या समाजातही त्यांची स्वतःची प्रथा आहे. आज आपण लग्नासंदर्भात अशा बर्याच ठिकाणच्या रीतीरिवाजांविषयी जाणून घेणार आहोत. जे आपल्यासाठी नवीन असेल, परंतु विचित्र देखील असेल.
आई झाल्यानंतर लग्न
राजस्थानातील उदयपूर, सिरोही आणि पाली जिल्ह्यात आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या गरासिया जमातीमध्ये लग्न करणे ही एक अनोखी प्रथा मानली जाते. येथे लग्नाआधी मुलांना जन्म देणे शुभ मानले जाते. ही विचित्र गोष्ट आहे, परंतु ही परंपरा गेल्या 1000 वर्षांपासून चालू आहे. येथे लग्नाआधी मुले-मुली एकत्र राहतात, जर मूल जन्मला तर लग्न होते. आणि मूल झालं नाही तर त्या संबंधाला मान्यता मिळत नाही.
सर्व भावांची एक वधू
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात महाभारताच्या द्रौपदीचा उल्लेख आहे. येथील मुली एकाच घरातील सख्या भावांसोबत विवाह करु शकतात. या प्रथेला इथली घोटुल प्रणाली म्हणतात. हे पांडव आणि द्रौपदी यांचे उदाहरण मानले जाते. महाभारताच्या काळात द्रौपदी व माँ कुंती यांच्यासह पांडवांनी किन्नौर जिल्ह्यातील गुहांमध्ये वनवासाचे काही क्षण घालवले होते.
महिला करु शकते एकापेक्षा जास्त विवाह
मेघालयात खासी जमात एक अनोखी प्रथा पाळत आहे. इथल्या महिला स्वतःहून लग्न करतात. तिला पाहिजे त्याप्रमाणे लग्न करता येते. या जमातीमध्ये स्त्रियांना महत्त्व दिले जाते. स्त्रिया त्यांच्या मनानुसार पतीसोबत राहू शकतात. अन्यथा ते दुसर्या कोणाशीही लग्न करू शकतात. आज ही प्रथा बदलण्याची मागणी होत आहे.
भाऊ बहिणीचे लग्न
छत्तीसगडमध्ये, धुरवा आदिवासी समाजात भाऊ-बहिणी आपापसात लग्न करतात. लग्न सख्या भावंडांमध्ये होत नाहीत. मामा आणि आत्याची मुले एकमेकांशी लग्न करतात. या प्रथेचे काटेकोरपणे पालन केले जाते, लग्न करण्यास नकार दिल्यास कठोर दंड दिले जाते. बरेच सुशिक्षित लोक या प्रथेला विरोध करतात.
मामा आणि भाचीचे लग्न
लग्नासंदर्भात दक्षिण भारतीय समाजातील ही एक अतिशय विचित्र प्रथा आहे. येथे मामा आणि भाची यांचे लग्न चांगले मानले जाते. लोक या लग्नाला महत्त्व देतात. असे मानले जाते की मामा आणि भाचीच्या लग्नामागे एक कारण आहे. बहीण संपत्तीत वाटा मागू नये म्हणून मामा आपल्या भाचीशी लग्न करतात. असं देखील येथे मानले जाते.