राहुल गांधी यांच्यासोबत दिसणाऱ्या महिलेला ओळखलत का? भारताला मिळवून दिलयं मानाचं स्थान
भारत जोडो यात्रेदरम्यान या महिलेने राहुल गांधी यांची भेट घेतली आहे
काँग्रेसचे (congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर (bharat jodo yatra) आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी अनेकांच्या भेटी घेत आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण राहुल गांधी यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांची भेट घेत आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत एका महिलेचाही फोटो व्हायरल होत आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही महिला कोण आहे? पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केलेली ही महिला राहुल गांधींसोबत हसताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तर राहुल गांधी यांच्यासोबत असणाऱ्या महिला या भारतीय क्रीडा क्षेत्रात देशाच्या शान आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना अर्जुन पुरस्काराने (arjuna award) सन्मानित करण्यात आले आहे. राहुल गांधीसोबत फोटोत दिसणाऱ्या या माजी भारतीय अॅथलीट पद्मिनी थॉमस (Padmini Thomas) आहेत.
सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. तो लोकांमध्ये मिसळत आहे. सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तिरुअनंतपुरममधील पलायम येथे होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.
अर्जुन पुरस्काराने सन्मानित
पद्मिनी थॉमस यांचा राहुल गांधींसोबतचा हा फोटो सोमवारी तिरुअनंतपुरममधील पलायम येथे काढण्यात आला होता. पद्मिनी थॉमस यांनी वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांमध्ये भारताचे मान उंचावली आहे. 1982 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. पद्मिनी यांनी 4x100 मीटर रिले शर्यतीत रौप्य आणि 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय पद्मिनी थॉमस केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. त्यांना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मिनी यांचे लग्न जॉन सेल्वनशी झाले होते. तेही एक भारतीय खेळाडू होते. जॉन यांचे 6 मे 2020 रोजी निधन झाले. तिरुअनंतपुरम येथील घराच्या टेरेसवरून ते पडले होते. पद्मिनी यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव डायना जॉन सेल्वन आणि मुलाचे नाव डॅनी जॉन सेल्वन आहे. दोघेही क्रीडापटू आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांची यात्रा ही 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर हे 3,570 किमी अंतर 150 दिवसांच्या कालावधीत पार करेल. देशातील 22 शहरांमध्ये रॅली काढण्यात येणार आहे.