मुंबई : भारतात एटीएम कार्ड आणि एटीएम मशिन आल्यामुळे लोकांचे जगणं सोपं झालं आहे. कारण यामुळे त्यांचा वेळ वाचला आहे शिवाय ते कोणत्याही वेळी त्यांच्या बँकेतून पैसे काढू शकतात. ज्यामुळे लोकांनी एटीएम कार्डचा वापर करणं सुरूवात केलं. त्यानंतर आता डिजिटलचा जमाना आला आहे. ज्यामुळे एटीएमचा वापर करणं कमी झालं असलं तरी अजूनही अनेक लोकं याचा वापर करतात. कोणाला हार्ड कॅश द्यायची असेल किंवा ग्रामीण भागात, तसेच डिजीटल पेमेंटमधील अडचणींमुळे लोकं अजूनही एटीएम वापरतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्डद्वारे तुम्ही गरजेनुसार सहज  कोणत्याही वेळी पैसे काढू शकता. आजच्या डिजिटल युगात एटीएम कार्डद्वारेही खरेदी करता येते.


परंतु हे लक्षात घ्या की, डिजीटल युगात सगळंच बदललं आहे, ज्यामुळे फ्रॉड करणाऱ्या लोकांनी देखील आपल्या पद्धतींमध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे फसवणूकिच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. इंटरनेटच्या आगमनानंतर सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.


गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात सायबर फसवणूक करणाऱ्यांनी डेबिट कार्डधारकांना टार्गेट केलं आहे. तुम्हीही डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला सावध राहाणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.


अशा परिस्थितीत एटीएम/डेबिट कार्ड वापरताना चुकूनही या चूका करू नका.


तुमच्या कार्डवर पिन नंबर लिहू नका


अनेकदा लोक एटीएम कार्डचा पिन क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी एटीएम कार्डवर तो लिहितात. परंतु अशा प्रकारची चूक कधीही करु नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.


एटीएम कार्डची माहिती कोणाशीही शेअर करू नका


तुम्ही तुमच्या एटीएम कार्डची माहिती इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. असे केल्याने तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.


पिन तयार करण्यासाठी तुमचा वाढदिवसाची तारीख, खाते क्रमांक, फोन नंबर वापरू नका. पिन तयार करताना असे नंबर निवडा जे कोणालाही सहजासहजी मिळणार नाही.


एटीएममधून एकट्यानेच पैसे काढा


जेव्हाही तुम्ही एटीएम मशिनमधून पैसे काढता तेव्हा त्या वेळी तुमच्यासोबत दुसरी व्यक्ती नसेल याची विशेष काळजी घ्या. तुमच्या शेजारी दुसरा कोणी उभे असेल तर त्यांना तेथून निघायला सांगा. तसेच जर एटीएममधून पैसे निघत नसतील तर दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ नका. ओळखीच्याच व्यक्तीचा सल्ला घ्या.