नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीमध्ये अनोखी घटना समोर आलीये. जामियानगरमधील एका एटीएमधून पैसा काढणाऱ्या व्यक्तीला दोन हजारांची नोट मिळाली मात्र ती अर्धी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शादाब चौधरी हे जामियानगरच्या एटीएममधून पैसै काढत होते. त्यांनी एटीएममधून १० हजार रुपये काढले. मात्र त्यात एक दोन हजार रुपयांची अर्धी नोट मिळाली. या नोटेच्या अर्ध्या भागाला कागद चिटकवला होता. 


यानंतर शादाब यांनी लगेचच कस्टमर केअरला फोन करुन ही हकिकत सांगितली. मात्र तेथूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. 


शादाब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढताना अशी नोट माझ्या हातात आली. मी ती नोट सीसीटीव्हीच्या दिशेने धरली जेणेकरुन ही नोट एटीएममधून आली हे मी सिद्ध करु शकेन. मात्र त्यावेळी कॅमेरा सुरु होता की नाही हे सांगू शकत नाही. 


शादाब पुढे म्हणाले, एटीएममधून आलेल्या अर्धवट नोटेमुळे मला माझी बाकीची कामे सोडून यासाठी धावपळ करावी लागली. मी कस्टमर केअरपासून बँक आणि पोलिसांकडेही याबाबत तक्रार केलीये. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.