मुंबई :  एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची  (Debit Card)आवश्यकता भासणार नाही. आपण यूपीआय अॅपच्या (UPI App)माध्यामातून क्यूआर कोड (QR Code)स्कॅन करून देखील एटीएममधून पैसे काढू शकता. त्यासाठी ATM बनविणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशने खास UPI प्लेटफॉर्म आधारित ICCW सॉल्यूशन लॉन्च झाली आहे.


ATM अपग्रेड केले जातेय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (ICCW) सॉल्यूशनने खास तयार केलेली एटीएम अनेक ठिकाणी सिटी युनियन बँकेने ((Citi Union Bank) एनसीआर कॉर्पोरेशन (NCR Corporation)बरोबर हातमिळवणी केली आहे. आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त एटीएम अपग्रेड केले गेले आहे, अनेक ठिकाणांवर वेगवान श्रेणीसुधारित काम चालू आहे.


नवीन एटीएमतून कसे निघणार पैसे


नवीन एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. या फोनमध्ये युपीआय अॅप (GPay, BHIM, Paytm, Phonepe, Amazon) असणे गरजेचे आहे. ते ओपन करुन एटीएममधील क्युआर कोड स्कॅन करावा लागेल.  स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या फोनवर एंटर करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रोसेसिड बटण दाबा. यानंतर आपण 4 किंवा 6 अंकाचा UPI PIN मागितला जाईल. तो टाकला की आपल्या हातात कॅश अर्थात पैसे मिळतील. एकावेळी केवळ पाच हजार रुपये काढता येतील.


युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) एक रियल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जे मोबाइल अॅपच्या मदतीने एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे त्वरित ट्रान्सफर होऊ शकतात. फक्त आपल्या बँकेच्या खात्यावर यूपीआय अॅपकडून लिंक करणे आवश्यक आहे. आपण अनेक बँक अकाउंट्सच्या एका युपीआय अॅपच्या मदतीने संचलित करु शकता आणि काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करु शकता.


 UPI खाते बनवू शकता


यूपीआय (UPI)अकाऊंट बनविण्यासाठी यापैकी GPay, BHIM, Paytm, Phonepe, Amazon कोणतेही अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करु शकता. त्यानंतर आपला मोबाइल नंबर डॉलरवर हे रजिस्टर करा. त्यानंतर आपल्या अकाऊंट अॅड करा. अकाऊंट्सच्या नावानंतर येथे आपल्या बँकेच्या नावाने सर्च करणे आवश्यक आहे. बँकेच्या नावावर क्लिक करा त्यानंतर आपल्या अकाउंट अॅड करा. जेव्हा आपल्या मोबाइल नंबरवर खाते लिंक येईल त्यावेळी ते जोडा. अकाउंटचा सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आपल्या एटीएम कार्डाची डिडेल द्यावी लागेल. त्यानंतर आपले युपीआय खाते तयार होईल.