ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, SBI कडून ग्राहकांना ट्वीटरद्वारे माहिती
एटीएममधून होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या खातेधारकांसाठी दररोज नवीन ऑफर आणि नियम बदलत असते. बँक नेहमीच आपल्या खातेदरांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. जर तुमचे खाते SBI मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.
एटीएममधून होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. SBI च्या ATM मधून पैसे काढण्यासाठी आता ग्राहकांनाा OTP आवश्यक असेल. हा ओटीपी ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवरती येईल. सिक्युरिटीच्या दृष्टीने बँकेनं हे पाऊल उचललं आहे.
या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे माहित नसेल तर ते चांगले जाणून घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणून पुढच्या वेळेस पैसे काढायला जाताना तुमचा फोन सोबत घेऊन जा.
एसबीआय बँकेने ट्विट करून ही माहिती आपल्या ग्राहकांना दिली आहे. एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपीची मदत घ्यावी लागेल. हा OTP तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला ते टाकून नंतर तुमचे पैसे मिळतील.
हा OTP चार अंकी असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
रोख पैसे काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
बँकेकडे सातत्याने फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. SBI चे 22 हजार 224 शाखा आणि 63 हजार 906 ATM चे सर्वात मोठे नेटवर्क आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे.