मंबई : देशातल्या पाच राज्यात निर्माण झालेल्या रोखीच्या तुटवड्याची दखल घेतली असून तुटवडा दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली असल्याचा दावा अर्थमंत्री अरूण जेटलींनी केला आहे. सणासुदीच्या पूर्वसंध्येला झालेल्या रोखीच्या तुटवड्यानं पाच राज्यात एटीएमध्ये खडख़डटात झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रामुख्यानं तेलंगणा, आंध्रप्रदेश, विदर्भाचा काही भाग आणि गुजरातमध्ये रोखीनं व्यवहार करणं कठीण झालंय. सलगच्या सुट्ट्यांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्ष तपास केल्यावर व्यवहाराता पुरेसं चलन असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे रोकड नेमकी कुठे आहे. लोकांनी पुन्हा एकदा नोटा साठवायला सुरूवात केलीय की काय अशी भीती व्यक्त होतेय..