अनंतनाग : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर काश्नीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे, यात सुरूवातीला २ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता, मात्र हा आकडा आणखी वाढला आहे, आतापर्यंत १० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आकडा वाढू शकतो. हल्ल्यात अनेक यात्रेकरू जखमी देखील झाले आहेत. अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी बसवर अंधाधुंद फायरिंग केली आहे.  जखमींमध्ये पोलिसांचा देखील समावेश आहे.


आणखी काही ठिकाणी अमरनाथ यात्रेवर गोळीबार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेवर यापूर्वी २००७ साली दहशतवादी हल्ला झाला होता.


अमरनाथ यात्रा ४० दिवस चालते, अडीच लाख लोकांनी यात्रेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. सुमारे ४० हजार सुरक्षा रक्षक यात्रेसाठी तैनात केलं आहे.


 ड्रोनच्या सहाय्याने देखील चित्रिकरण करून अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा काढला जात आहे. अतिरेक्यांचा पाठलाग सुरू आहे, अमरनाथ यात्रेच्या आजूबाजूला दूर्गम परिसर असल्याने अतिरेक्यांचं फावलं आहे.