मुंबई : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एक नव्या दिग्गज प्लेअरची एन्ट्री होत आहे. जर्मनीची प्रमुख लग्जरी कार निर्माता कंपनी Audi ने इलेक्ट्रीक वाहन Audi e-torn ला लॉंच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सोशलमीडियावर आपली इलेक्ट्रिक एसयूवी लॉंच करण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. भारतीय बाजारामध्ये ही कार 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल मार्केटमध्ये Audi च्या इलेक्ट्रिक कार आधीपासूनच आहेत. परंतु भारतीय बाजारात ऑडीतर्फे ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑडीची ही एसयूवी देशातील वेगवेगळ्या डीलरशिपकडे पोहचणे सुरू झाले आहे. आता केवळ किंमतीचा खुलासा होणे बाकी आहे. लवकरच याची बुकिंग सुरू होईल.


वैश्विक बाजारात ऑडी ई ट्रॉनचे प्रदर्शन उत्तम आहे. ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीने या एसयूवीचे 17 हजार 641 युनिट्सची विक्री केली होती. 


ऑडी ई-ट्रोन 55 क्वाटो वेरिएंट 168 एचपी आणि 247 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच बुस्ट मोडमध्ये 402 एचपी आणि 664 एनएम मिळते. ही एसयूवी फक्त 5.7 सेकंदामध्ये 0 पासून 100 किलोमीटर प्रतितासाची गती पकडू शकते. या कारची टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रतिघंटा आहे. ही एसयूवी एका चार्ज मध्ये 365 ते 436 किलोमीटरपर्यंत धावू शकते.