ऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात तीन ते पाच सुट्ट्या; आताच तारखा पाहा आणि भटकंतीचे बेत आखा
Holidays in August 2023: नोकरदार वर्गाची चांदी; ऑगस्ट महिन्यात तुम्हीही सुट्ट्या मारण्याच्या बेतात आहात का? आता जास्तीच्या सुट्ट्या खर्ची घालायची गरज नाही. कारण, आयत्या सुट्ट्याच तुमची वाट पाहत आहेत.
August 2023 Holidays List: नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच आठवड्याच्या शेवटी मिळणारी सुट्टी किंवा 'सुट्ट्या' मोठा दिलासा देऊन जातात. दररोदज नोकरीच्या ठिकाणासाठी केला जाणारा प्रवास, त्यानंतर निर्धारिक तासांहूनही अधिक वेळ कार्यालयात बसून केलेलं काम आणि अतिप्रचंड ताण या साऱ्यातून या सुट्टीच्याच दिवशी उसंत मिळते. या सुट्टीच्या बाबतीतही बहुतांश कार्यालयांमध्ये वेगवेगळी धोरणं असतात. मग ती भरपगारी सुट्टी असो किंवा शासकीय सुट्ट्या असो. काही कंपन्या कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेत पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि दोन दिवसांची आठवडी सुट्टी अशी आखणी करतात. तर, काही संस्था आठवड्याला एकच सुट्टी देतात.
सुट्ट्यांचं हे गणित कामाच्या तासांवरही आधारलेलं असतं. काही संस्था मात्र इथंही कर्मचाऱ्यांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करत कामाचे जास्त तास आणि आठवड्याची एक सुट्टी असा नियम लागू करतात. अर्थात हा वादाचा विषय. इथं सुट्ट्यांचा मुद्दा केंद्रस्थानी येण्यामागचं कारण म्हणजे ऑगस्ट महिना. कारण, या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसह बँकांमध्ये काम करणाऱ्यांचीही चांदी होणार आहे. खासगी कार्यालयं मात्र त्यांच्या धोरणांनुसार कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देतील. पण, त्यांचाही इथं फायदाच आहे असं म्हणायला हरकत नाही.
ऑगस्ट महिन्यात चला एखाद्या सहलीला...
एकिकडे ऑगस्ट महिन्यापासून सणवारांची सुरुवात होतेय, तर दुसरीकडे सुट्ट्यांचीही चंगळच पाहायला मिळतेय. या महिन्यात सणावारांच्या सुट्ट्यांमध्येच व्यवस्थित पाहिल्यास काही सुट्ट्या सलग आल्या आहेत. त्यामुळं एकादी PL, Sick leave किंवा तत्सम रजा घेऊन तुम्हीही कुटुंब आणि प्रियजनांसोबत किंवा मग एकट्यानंच एखाद्या छान ठिकाणी सहलीसाठी, भटकंतीसाठी जाऊ शकता.
कधी आहेत या सुट्ट्या?
ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा व्यवस्थित पाहा, इथं अनेक कार्यालयांना रविवारची आठवडी सुट्टी असेल. मधला एक सोमवार सोडला तर, मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि 16 ऑगस्ट रोजी, बुधवारी पारशी नववर्षाची रजा आहे. थोडक्यात 11 ऑगस्टला नोकरीचा दिवस भरून तुम्ही 12 ते 16 ऑगस्ट अशी मोठी सुट्टी घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला शनिवारी आठवडी सुट्टी नसल्यास तो दिवस आणि सोमवारचा दिवस अशी आखणी करावी लागेल.
हेसुद्धा वाचा : ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या 'बँक हॉलिडे'ची यादी
अगदीच मोठा बेत आखायचा झाल्यास तुम्ही हा संपूर्ण तिसरा आठवडाच सुट्टी घेऊन थेट चौथ्या आठवड्याच्या सोमवारी नोकरीवर रुजू होऊ शकता. हो, पण सुट्ट्यांची आखणी करताना एक बाब लक्षात ठेवा, की नोकरीच्या ठिकाणी याची पूर्वसूचना नक्की द्या. सुट्ट्यांची व्यवस्थित आखणी करून, काम संपवूनच हा निर्णय घ्या. हो... फक्त यासाठी उशिर करू नका बरं!