तिरुअनंतपुरम : कोणी आवड म्हणून कुत्रा पाळतं तर कोणी मांजर तर कोणी पक्षी पाळतं. पण एका व्यक्तीनं घरात साप ठेवला आहे. हा साप साधा नाही तर अजगर आहे. नुसतं अजगराला पाहिलं तरी आपल्याला धडकी भरते तिथे या व्यक्तीनं अजगराला आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिक्षा चालकानं आपल्या घरात अजगर ठेवला आहे. या अजगरावर तो भरभरून प्रेमही करतो. दक्षिण आफ्रिकेतून खास हा विशिष्ट जातीचा अजगर दोन वर्षांपूर्वी त्याने मागवला होता. याशिवाय त्याच्याकडे अनोख्या जातीचा एक प्राणी देखील आहे जो प्राणीसंग्रहालयातच जास्त पाहायला मिळतो. 


या दोघांचा सांभाळ रिक्षा चालक आपल्या मुलांप्रमाणेच करतो. हा रिक्षा चालक तिरुअनंतपुरम इथल्या बलरामपुरम परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली आहे. इलियाना असं या अजगराचं नाव ठेवलं आहे. या शिवाय त्याच्याकडे इग्ना नावाचा एक प्राणी देखील आहे. 



3 फूट लांबीचा हा अजगर तो आपल्या घरात आपल्या मुलाप्रमाणे वाढवत आहे. या रिक्षा चालकाचं नाव शाजी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला साप, अजगर आणि वेगवेगळ्या जातीचे प्राणी पाळण्याचा छंद आहे. त्याचा हा छंद पाहून कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. त्यांचा मुलगाही न घाबरता अजगर आणि नागाला आपल्या हातात उचलून घेतो. 


या इलियाना आणि इजियाना या दोघांनाही अगदी लहान असताना शाजीने आपल्या घरी आणलं होतं. या दोघांनी अजूनतरी कुटुंबासह आजूबाजूच्या लोकांना कोणताही त्रास दिला नाही किंवा इजा केली नाही. हा अजगर खास विदेशातून मागवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या खाण्यासाठी वेगळा खर्च येतो. 



या अजगरासाठी विशेष पिंजरा तयार करून घेण्यात आला आहे. अजगराला भूक लागल्याचं शाजीला कळल्यावर त्याला कोंबडी आणि उंदीर खायला देतो. ते खाल्ल्यानंतर पुढचे 2 दिवस ही इलियाना कुणालाही हात लावायला देत नाही. 


दोन दिवसातून एकदा आहार दिला जातो. साप आणि त्याचा कळप पाहण्यासाठी आजही जिल्ह्याच्या विविध भागातून लोक येतात. इथे येणारे बहुतेक लोक शाजीचे मित्र आहेत.