महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?
Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले....
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग ( Mahidndra and mahindra group) समुहांचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी कायमच भारतात आणि भारताबाहेरही महिंद्राच्या कारच्या प्रसिद्धीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. Auto क्षेत्रामध्ये सातत्यानं सुरु असणारी प्रगती पाहता महिंद्रा समुह या स्पर्धेमध्ये नेमका कसा तग धरू शकेल यासाठी क्षणोक्षणी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये आनंद महिंद्रा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं घेतली जातात.
सोशल मीडिया आणि उद्योग जगतामध्ये सतत सक्रिय आणि सजग असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच Mahindra And Mahindra चा सर्वतोपरी महत्त्वं दिल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. अशा या जगविख्यात उद्योगसमुहाच्या उत्पादनांना नावं ठेवणाऱ्या आणि जाहीरपणे महिंद्राच्या कारना 'भंगार' म्हणणाऱ्या एका व्यक्तीचा खुद्द आनंद महिंद्रा यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
X या सोशल नेटवर्किंग साईटवरून महिंद्राच्या कारना भंगार म्हणणाऱ्या या इसमाची पोस्ट रिशेअर करत या उद्योजकानं त्याला आपल्याच शैलीत सुनावत त्याच्या संशयखोर वृत्तीचे उपरोधिक सुरा आभार मानले. इतरांच्या टीकांनी आपल्याला नेमकी कशी प्रेरणा मिळते, हेसुद्धा त्यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं.
वादाची ठिणगी कुठे पडली?
आनंद महिंद्रा यांनी नुकतीच Mahindra XUV 3XO सर्वांसमोर आणली. त्यांच्या याच पोस्टला उत्तर देत अर्णव श्रीवास्तव नावाच्या युजरनं महिंद्राच्या कार अमेरिका आणि जपानी तंत्रज्ञानाच्या वापर करून तयार करण्यात आलेल्या कारशी स्पर्धा करू शकत नाहीत, असं म्हणत महिंद्रा कार दिसेनाशा होतील असा काहीसा नकारात्मक सूर आळवला. Trash Cars म्हणत त्यानं सर्वांच्या नजरा रोखल्या.
Mahindra Cars बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या या युजरला उत्तर देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढत एक पोस्ट केली. ते म्हणाले, 'तुमच्या संशयखोर वृत्तीचे मी आभार मानतो. ही वृत्ती आमच्या पोटाली आगीत इंधनाचच काम करतेय. 1991 मध्ये ज्यावेळी मी या कंपनीत रुजू झालो होतो तेव्हाही मला असंच काहीसं सांगत हिणवण्यात आलं होतं', असं महिंद्रा म्हणाले.
हेसुद्धा वाचा : तब्बल 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला अटल सेतू वाचवतोय प्रवासाची अवघी 15 मिनिटं; गणित लक्षात येतंय?
जागतिक स्तरावरील सल्लागारांनीतर कंपनीला या Auto Industry तून बाहेर पडण्याचाच सल्ला दिला होता. टोयोटा आणि जागतिक ख्यातीचे इतर प्रतिस्पर्धक भारतीय बाजारपेठांमध्ये उतरले तेव्हाही आम्हाला असंच सांगण्यात आलं, अशी त्या काळची परिस्थिती सर्वांसमोर आणत कंपनीनं या आव्हानात्मक परिस्थितीतही तग धरला या शब्दांवर महिंद्रा यांनी जोर दिला.
येणारा प्रत्येक दिवस हा अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा असतो आणि आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेतो. येत्या 100 वर्षांमध्ये तरी आम्ही इथंच असू आणि तुमच्यासारख्यांची दाद मिळवत असू... अशा उपरोधिक सुरात महिंद्रा यांनी त्या युजरची बतावणी परतवून लावली. सोशल मीडियावर या शाब्दिक देवाणघेवाणीची बरीच चर्चा झाली.