मुंबई : ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकर्‍या धोक्यात येण्याची शक्यता आहे. असा अहवाल एचएफएस रिसर्च या अमेरिकेन कंपनीने दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कमी कुशल कर्मचाऱ्यांना येत्या काही वर्षांमध्ये ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्सचा  मोठा फटका बसणार आहे. परिणामी २०२२पर्यंत सुमारे ७ लाख कर्माचार्‍यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. 
अभियांत्रिकी, उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग यासाख्या क्षेत्रांमधील नोकऱ्यांवर ऑटोमेशनमुळे संकट निर्माण झाले आहे. ऑटोमेशनचा वेग वाढल्याचा परिणाम उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा सेवा आणि कृषी क्षेत्रावर दिसून येत आहे. २०१६ साली या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या २४ लाख होती जी पुढील ५ वर्षात १७ लाखांवर येण्याची शक्यता आहे. 


 २०१६ मध्ये मध्यम कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची ९ लाख असलेली संख्या २०२२ पर्यंत वाढून १० लाखांपर्यंत पोहोचेल. उच्च कौशल्य असलेल्या व्यक्तींसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील. २०१६ मध्ये उच्च कौशल्य असलेल्या लोकांसाठी ३ लाख २० हजार नोकऱ्या उपलब्ध होत्या. २०२२ मध्ये हे प्रमाण ५ लाख १० हजार इतके होईल, असे या अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे.