मुंबई : GST Council च्या 44 व्या बैठकीत केंद्र सरकारने रुग्णवाहिकेवरील जीएसटीत घट केली होती. केंद्र सरकारने ही 28 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर ही जीएसटी आणली.  या कारणास्तव कंपनीने रुग्णवाहिकेच्या किंमतीत घट करायला सुरुवात केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी इको व्हॅनच्या अॅम्बुलेंसच्या सीरिजच्या दरात तब्बल 88 हजारांनी कपात केली आहे. यामुळे या वाहनाचे दर 6 लाख 16 हजार 875 रुपये (showroom Rate)  इतके झाले आहे. (automobile company maruti suzuki cuts eeco ambulance price cut to 12 percent  from current 28 percent says Finance Minister) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकीने शेयर बाजारला दिलेल्या सूचनेनुसार, जीएसटी कपातीनुसार इको अॅम्बुलेंसच्या एक्स शोरुमच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिल्लीत या इको अॅम्बुलेंसचे सुधारित दर हे 6 लाख 16 लाख 875 रुपये इतकी असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 जूनपासून करण्यात आली आहे.   


वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने 14 जूनला कोव्हिड संदर्भातील 18 उत्पादनांवरील जीएसटी दरात कपात करण्याचे अधिसूचित केले होते. यामध्ये हॅंड सॅनिटायजर,  प्लस ऑक्सीमीटर, परीक्षण किट,  रुग्णवाहिका आणि थर्मामीटरचा समावेश होता.    


जीएसटी काउन्सिलच्या 44 व्या बैठकीत रेमडेसीव्हीरच्या दरावरील जीएसटी दरात 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली. काळ्या बुरशीवरील औषध Tocilizumab, Amphotericin B यावर जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला. मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले.  
 
BiPaP मशीन, ऑक्सिजन कंसंट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटरवर लागू असेल. याशिवाय कोव्हीड टेस्टिंग किट्स, हँड सॅनिटायजर्स, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्सवरील जीएसटीत कपात करुन ती 5 टक्के करण्यात आला आहे.