मुंबई : देशाची राजधानी दिल्लीमधील तापमान सध्या उच्चांक गाठत आहे. थेट सूर्यप्रकाशामुळे शहराचे तापमान सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास झालं आहे. म्हणूनच दुपारच्या वेळेस लोकांची वर्दळ देखील फार कमी झाली आहे. दिल्लीच्या तापमाना संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयर होत असतात, यामध्ये काही व्हिडीओ मनोरंजक असतात. तर काही मीम्सच्या स्वरुपात समोर येतात. हल्लीच एका महिलेचा व्हिडीओ समोर आला होता. ही महिला दिल्लीच्या रस्त्यावर पॅनमध्ये अंड बनवत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थीतीत दिल्लीतील ऑटोचालक चर्चेत आला आहे. तो त्याच्या अनोख्या जुगाडामुळे.


खरं तर दिल्लीतील ऑटोचालक महेंद्र कुमार यांनी प्रवाशांना उन्हाची झळ लागायला नको आणि आपली रिक्षा आतुन थंड राहावी यासाठी एक अनोखी आणि नैसर्गिक पद्धत अवलंबली आहे. ज्यामुळे तो चर्चात आला.


प्रवाशांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी त्यांने आपल्या ऑटोरिक्षाच्या छतावर बगीचा बनवला आहे. त्याने त्याच्या ओळखीच्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या नर्सरीमधून बिया मिळवल्या आणि छतावर चटई आणि थोडी माती टाकून त्या बियांची लागवड केली. आता तिथे सुंदर रोपे उगवली आहेत.


फ्रेंच न्यूज एजन्सी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत महेंद्र कुमार म्हणाले, 'सुमारे 2 वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या पीक सीझनमध्ये मला अचानक ऑटोवर अशी बाग बनवण्याची कल्पना आली. मला वाटले की, जर मी छतावर काही रोप लावू शकलो, तर ते माझी ऑटो थंड ठेवेल आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उष्णतेपासून आराम मिळेल.'


आता पूर्वीपेक्षा जास्त प्रवासी मिळू लागले


महेंद्र कुमार यांची ही कल्पना कामी आली. आता ऑटोच्या छतावर बांधलेली ही बाग त्यांना कडक उन्हापासून तर वाचवतेच पण आता त्यांना पूर्वीपेक्षा जास्त प्रवासी मिळू लागले आहेत. वाटेत लोक त्यांच्या ऑटोकडे आकर्षित होतात आणि फोटो काढण्यासोबतच ते व्हिडीओही बनवतात.


ऑटोच्या छतावर 20 प्रकारची झाडे लावली


दिल्लीत शेकडो ऑटो धावतात, पण छतावर बाग असल्यामुळे महेंद्र कुमारचा ऑटो सगळ्यांपेक्षा वेगळी दिसतो. एवढेच नाही तर त्याने आपल्या ऑटोमध्ये 2 मिनी कुलर आणि पंखे बसवले आहेत. महेंद्र कुमार सांगतात की, त्यांच्या ऑटोमध्ये बसल्यानंतर प्रवासी इतके खूश होतात की, 10-20 रुपये जास्तीचेही ते आनंदाने त्याला देतात. त्यांनी सांगितले की, त्यांनी ऑटोच्या छतावर सुमारे 20 प्रकारची झाडे लावली आहेत. असे करून ते पर्यावरणाची छोटीशी सेवा करत आहेत.