Avalanche in Uttarkashi: उत्तराखंड हिमस्खलन मोठी अपडेट, आत्तापर्यंत 10 ट्रेकर्सचा मृत्यू...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती...
Avalanche in Uttarkashi: दोन दिवसांपूर्वी उत्तरकाशीच्या काही भागात भूकंपाचे झटके आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. उत्तरकाशीचा हा भाग डोंगराळ भागामध्ये मोडला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खनचे प्रकार याआधी देखील समोर आले होते. अशातच आता उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना (Uttarakhand avalanche) घडल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. त्यानंतर आता उत्तराखंड हिमस्खलन प्रकरणात मोठी अपडेटसमोर आली आहे. आत्तापर्यंत 10 ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.( Avalanche in Uttarakhand, over 28 trainees stuck; huge rescue operation on Uttarakhand Latest News)
आठवडाभरपुर्वी म्हणजे 23 सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेच्या 40 गिर्यारोहकांची एक टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर (Draupadi Danda 2 Mountain Peak) गेली होती. त्यानंतर आलेल्या हिमवादळामुळे टीममधील सर्वच जण हिमस्खलनात अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच NIM च्या टीमसह जिल्हा प्रशासनाची टीम, NDRF, SDRFआणि ITBP ची टीम रेस्क्यूसाठी पाठवण्यात आली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या माहितीवर शिक्कामोर्तब केला. 20 गिर्यारोहक अडकले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 40 जणांच्या टीममध्ये 7 जण प्रशिक्षक असताना देखील ही घटना घडली.
आणखी वाचा- जगातील सर्वात उंच महादेव मंदिर; Video पाहून तुम्हीही म्हणाल Incredible India!!
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून लष्कराच्या मदतीची मागणी केली होती. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या टीम पाठवण्यात आली आहे. तर दोन चित्ता हॅलिकॉप्टर तैनात केली आहे. तर आणखी एक टीमला स्टँडबायवर ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. उत्तरकाशी येथील गिर्यारोहम मोहिमेमध्ये भुस्खलनामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानीमुळे खुप दु:ख झाले, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.