हरियाणा: भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गायी महिला बॉक्सरने केल्या परत
भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या `गाय पे चर्चे`ला आणखी एक वळण मिळाले आहे.
हरियण : भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या 'गाय पे चर्चे'ला आणखी एक वळण मिळाले आहे.
गायी आहेत मारकूट्या, दूध तर देतच नाहीत
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हरियाणा सरकारने नॅशनल चॅम्पीयनशीप मिळवल्याबद्धल सहा महिला बॉक्सर्सना भेट म्हणून गायी दिल्या होत्या. मात्र, या गायी दूध देत नाहीत. तसेच, उलट परिवारातील लोकांवरच हल्ला करतात, असा बॉक्सर्सचा दावा आहे. रोहतक येथील बॉक्सर ज्योती गुल्लाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'माझ्या आईने गायीला पाच दिवस चांगला आहार दिला. तिची निगा राखली. पण, सरकारच्या गायीने काही दूध दिले नाही. उलट, आईवर तिन वेळा हल्ला करून तिला जखमी केले. त्यामुळे भेट म्हणून मिळेलेली गाय मी सरकारला तत्काळ परत केली.' असे सांगतानाच, 'आम्ही आपले आमच्या म्हशींसोबतच खूश आहोत', असेही ज्योतील गुल्लाने म्हटले आहे.
राज्य सरकारडून मिळाल्या होत्या गायी भेट
महिला बॉक्सर्सनी नोव्हेंबर महिन्यात गुवाहटी येथे झालेल्या स्पर्धेत पदक जिंकले होते. यात भिवानी येथील निवासी नीतू घंघास, साक्षी कुमार, हिसार येथील ज्योती आणि शशी चोपडा यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीत सूवर्ण पदक जिंकले होते. याशीवाय अनुपमा आणि नेहाने ब्रॉन्ज पदक जिंकले होते. त्यामुळे या महिला बॉक्सर्सचे अभिनंदन करत व सन्मान करत राज्य कृषीमंत्री ओम प्रकाश यांनी सरकारच्या वतीने या खेळाडूंना गायी भेट दिल्या होत्या. तसेच, या गायी देताना ओम प्रकाश यांनी म्हटले होते की, गायीच्या दूधामुळे हे खेळाडू अधीक प्रभावी होतील.
दरम्यान, ज्योतीसोबतच नीतू आणि साक्षीनेही गायी दूध देत नसल्याच्या कारणावरून सरकारला परत केल्या आहेत. तसेच, या गायी कुटुंबियांवरच हल्ला करतात, असेही या खेळाडूंनी म्हटले आहे.