Love Jihad Case : बातमी आहे एका धक्कादायक घटनेची. लग्नाच्या 12 वर्षांपर्यंत ज्या पत्नीला हिंदू (Hindu) समजत होता ती मुस्लिम असल्याचं समोर आलं. 12 वर्षांनंतर ती महिला पूजा (Pooja) या नावाने पतीबरोबर संसार करत होती. पण तिंच खरं नवा हसीना बानो (Hasina Bano) असल्याचं पतीला समजलं. पतीचं नाव जगबीर असं असून हे प्रकरण उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) अयोध्या (Ayodhya) इथलं आहे. पूजाची खरी ओळख उघड झाल्यानंतर आता ती आणि तिचे नातेवाईक जगबीरवर धर्मपरिवर्तनासाठी (Religious Conversion) दबाव टाकत आहेत. इस्लाम (Islam) धर्म न स्विकारल्यास जगबीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी जगबीरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओळख लपवत केलं लग्न
या प्रकरणाचा तपास सुरु झाल्यानंतर एक एक खुलासा होत गेला. जगबीर अयोध्येतल्या हल्कारा इथल्या पुरवा गावात रहातो. जगबीर आणि पूजाची ओळख रेल्वे स्टेशनवर झाली. आपलं या जगात कोणी नसल्याचं तीने जगबीरला सांगितलं. त्यानंतर जगबीरने आपल्या कुटुंबियांशी तिची भेट घालून दिली. पूजा त्यांच्याच कुटुंबात राहू लागली आणि हळूहळू तीने कुटुंबातील लोकांची मनं जिंकली. काही महिन्यांनी जगबीरच्या कुटुंबियांनी त्याचं पूजाबरोबर लग्न लावून दिलं. जगबीर आणि पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.


पूजाने मुलाचं केलं धर्मपरिवर्तन
लग्नाच्या 12  वर्षांपर्यंत सर्वकाही ठिक सुरु होतं. पण त्यानंतर पूजा आपल्या दोन्ही मुलांना इस्लाम धर्माचं शिक्षण देऊ लागली. जगबीरला ही गोष्ट कळताच त्याने विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर पूजाने आपलं खरं नाव हसीना बानो असल्याचं जगबीरला सांगितलं. सत्य कळताच जगबीरच्या पायाखालची जमीन सरकली. पण पूजाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. जगबीरच्या म्हणण्यानुसार पूजाने मुलाचं धर्मपरिवर्तनही केलं.


हसीना बानोच्या कुटुंबियांकडूनही धमकी
धक्कादायक म्हणजे पूजा उर्फ हसीना बानो एकटी नव्हती तर तिचं कुटुंबियंही होतं आणि ही गोष्ट तीने जगबीरपासून लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर कुटुंबियांकडूनही जगबीरवर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकण्यात आला. जगबीरचं घर आणि त्याची इतर प्रॉपर्टीही पूजा उर्फ हसीना बानोला आपल्या नावावर करायची होती. या सर्व प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे.