Ayodhya Ram Mandir Inauguration: भगवान रामाचे जन्मस्थान अयोध्या आहे. शरयू नदीच्या काठावर अयोध्या हे शहर वसलेले आहे. इथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे अंतिम टप्प्यात असून काहीच दिवसांत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. तर, परदेशातीलही काही पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी 4000 हून अधिक साधू उपस्थित राहणार आहेत. तुम्हालाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे असेल तर जाणून घेऊया राम मंदिराचा उद्घाटन सोहळा कधी आहे. तसंच, अयोध्येत फिरण्यासाठी कोणते पर्यटन स्थळी आहेत आणि कोणत्या वेळी तुम्ही तिथे फिरु शकता याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 


कधी आहे राम मंदिराचे उद्घाटन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित काम वेगाने पूर्ण करत आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्याच्या रस्त्यांवर सुंदर नक्षीने सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुरेख 


अयोध्येतील प्रेक्षणीय स्थळ


राम मंदिराची घोषणा झाल्यापासून अयोध्या एक पर्यटन स्थळ म्हणून ओळख बनली आहे. तुम्हीदेखील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यासाठी जाण्याचा प्लान कराताय तर त्याचबरोबर आणखी थोडी मोठी सुट्टी धेऊन तुम्ही अयोध्यातील काही खास ठिकाणं फिरु शकता. अयोध्येतील प्रेक्षणीय स्थळांची यादी आणि कधी भेट द्याल याची माहिती वाचा. 


बहू बेगम मकबराः बहू बेगम मकबरा ताजमहलच्या नावानेही ओळखले जाते. नवाज शुजा-उद-दौला याची पत्नी आणि राणी दुल्हन बेगम उन्मतुजोहरा बानो यांना समर्पित मकबरा बांधण्यात आला होता. फैजाबादमधील हे सर्वात उंच स्मारक आहे. याच्यासमोरच सुंदर बाग बनवण्यात आली आहे. तर, या मकबऱ्यातून शहराचे सुंदर दृश्य दिसते. 


दंत धावन कुंडः हनुमानगढीच्या बाजूलाच दंतधावन कुंड आहे. असं म्हणतात की, भगवान श्रीराम या कुंडातील पाण्यानेच दात साफ करत होते. 


शरयू नदीः शरयू नदीच्या दर्शनासाठी आणि यात स्नान करण्यासाठी खूप लांबून लोक येतात. शरयू नदीच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते. त्याचबरोबर भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळतो. 


गुप्तार घाटः शरयू नदीच्या तटावर असलेल्या या घाटाला घग्गर या नावानेही ओळखले जाते. या जागीच भगवान राम यांनी ध्यान केले होते आणि या नदीत जल समाधी घेतली होती. असं म्हणतात की यानंतरच त्यांना वैकुंठ प्राप्ती झाली होती आणि भगवान विष्णुच्या अवतारात ते स्वर्गात गेले. 


अयोध्येत कधी जावे?


तसं तर अयोध्येत बाराही महिने वातावरण खूप छान असते.  हिवाळ्यात व गरमीच्या दिवसांत थंड हवा तर मध्येच उष्ण हवा जाणवते. अयोध्येत जाण्यासाठीचा योग्य वेळ ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान आहे. मार्च ते मे महिन्यात  इथे जाणे टाळलेले बरं राहिलं.