Ram Mandir Special Report: एकीकडे अयोध्येत (Ayodhya) भगवान श्रीरामाचं भव्यदिव्य मंदिर उभारण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. तर दुसरीकडं भगवान श्रीराम (Shri Ram) आणि माता जानकीच्या मूर्ती घडवण्यासाठी दोन खास शाळीग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. गेल्या 26 जानेवारीला नेपाळमधून (Nepal) दोन ट्रकमधून निघालेल्या या देवशिळांच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागलीय. कुणी शिळांना स्पर्श करून अभिवादन करतंय, तर कुणी या शिळांवरच माथा टेकतंय. या देवशिळांची जागोजागी आरतीही केली जात आहे. (Ayodhya Ram Mandir  Ram Lalla will sit in Ayodhya Shri Ram will descend from 6 crore years old rocks marathi news)


देवशिळांचं ऐतिहासिक आणि पुरातन महत्त्व नेमकं काय ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथिला अर्थात नेपाळ ही प्रभू श्रीरामांची सासरवाडी. त्यामुळं राम-सीतेच्या (Ram Sita) मूर्ती बनवण्यासाठी अर्थातच मिथिलेतल्या शाळीग्राम शिळांची निवड करण्यात आली. नेपाळच्या शालिग्रामी अर्थात बुढी गंडकी नदीतून या शिळा काढण्यात आल्या. त्याआधी नदीची क्षमा मागण्यात आली, खास पूजाविधीही करण्यात आला. शिळा काढण्यासाठी अर्थातच नेपाळ सरकारची (Napal Govt) परवानगीही घेण्यात आली. तब्बल 40 टन वजनाच्या या शिळा आहेत. त्या सुमारे 6 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा दावा केला जातोय.


शाळीग्राम शिळा आणि सोबतच्या भाविकांचा हा ताफा येत्या 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचणार आहेत. दरम्यानच्या काळात बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेश (UP) राज्यात ठिकठिकाणी या शिळांचं पूजन होणार आहे. गोरखपूरमधील गोरक्षपीठात शिळांच्या स्वागतासाठी खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.


आणखी वाचा - Ayodhya Ram Mandir: अमित शाह यांची मोठी घोषणा, 'या' तारखेला अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होणार


शिळांमधून साकारणार रामलल्ला


राम आणि सीतेच्या मूर्ती तयार करण्यासाठी खास मूर्तीकारांची निवड केली जाणार आहे. हे मूर्तीकार (sculptor) आपली ड्रॉईँग्ज श्रीराम जन्मभूमी (Sri Ram Janmabhoomi) तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे पाठवतील. ज्यांच्या ड्रॉईंग्जची निवड होईल, त्यांच्याकडे मूर्ती घडवण्याचं काम सोपवलं जाणार आहे. बाल स्वरुपातील रामलल्लाची मूर्ती 5 ते साडे 5 फूट उंचीची असेल. रामनवमीला सूर्यकिरण थेट रामलल्लाच्या माथ्यावर पडतील, एवढ्या उंचीच्या मूर्ती घडवल्या जाणार आहेत.


दरम्यान, 2024 च्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti 2024) मुहूर्तावर अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दरवाजे सामान्य लोकांसाठी खुले होणार आहेत. त्यावेळी शाळीग्राम शिळांमधून साकारलेल्या रामलल्लाचं दर्शन सगळ्यांना होणार आहे. त्यामुळे आता रामभक्त राममंदिराची आतुरतेने वाट पाहत आहेत.