अयोध्या : अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. इथल्या रामजन्मभूमी परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. याच खोदकामादरम्यान मोठा पुरातन ठेव मंदिर समिती ट्रस्टच्या हाती लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरासाठी 40 फूट खोल पाया खोदला जातोय. या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडले आहेत.  


रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रशासनाच्या माहितीनुसार 20 फूट खोदकाम केल्यानंतर इथं वेगवेगळ्या वस्तू सापडण्यास सुरवात झाली. 


सीता रसोईच्या उत्खननात पाटा-वरवंटा आणि लाटणे सापडले आहे. तर मानस भवनच्या उत्खननावेळी चरण पादुका सापडली आहे. मंदिराच्या ट्रस्टने या सर्व वस्तू सुरक्षित ठेवल्या आहेत.


राम जन्मभूमी परिसरात आधीपासून मंदिर होते असा दावा सुरुवातीपासून केला जात होता. आता उत्खनानातून हे अवशेष सापडल्याने इथे मंदिर होते ही शक्यता नाकारता येत नाही.


अर्थात उत्खननात सापडलेल्या मूर्ती नेमक्या कुणाच्या आहेत? दगडी वस्तू नेमक्या कोणत्या काळातील आहेत. याची तपासणी पुरातत्व विभागामार्फत केली जाणार आहे, त्यानंतरच या दाव्यातले तथ्य समोर येईल.