Ayushman Bharat Yojna: 70 वर्षांवरील सर्वांना विमा कवच, आयुष्मान भारत योजनेबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
Ayushman Bharat Yojna: 70 वर्षावरील नागरिकांना आता 5 लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठीत सरकारकडून यासंबंधीत घोषणा करण्यात आली.
Ayushman Bharat Yojna: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थींना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी म्हणजे आज कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यात लोकांना विनामुल्य उपचार मिळवून देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेत काही बदल करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सरकारच्या या एक निर्णयामुळे 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार आहे. ज्या नागरिकांचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभा होणार आहे. आता आयुष्मान भारत योजनेमध्ये या वयोगटाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जेष्ठ नागरिकांनाही विनामुल्य उपचार मिळणार आहेत.
योजनेतील बदल
4.5 कोटी परिवारातील 6 कोटी जेष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. सरकारने सांगितले आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांना एक नवीन कार्ड देण्यात येईल. जर जेष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारच्या कोणत्याही आरोग्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आयुष्मान भारत योजनेचाही लाभ घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्या नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. मग त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असो.
यांना घेता येणार योजनेचा लाभ
- ग्रामिण भागातील निराश्रित किंवा आदिवासी
- अनुसूचित जाती किंवा जनजातीचे दिव्यांग
- असंगठित भागात काम करणारे मजूर
- ज्यांच्या कुटुंबात कोणी अपंग आहे ते
- दारित्र्य रेषे खालील लोक
कोण या योजनेला लाभ घेऊ शकत नाही?
- संगठित क्षेत्रात काम करणोरे लोक
- ज्यांच्या कमाईतून पीएफ कट होतो
- ईएसआईसी चे मेंबर
- इनकम टॅक्स देणारे लोक
- ज्यांचे स्वतःचे पक्के घर आणि गाडी आहे ते
- सरकरी नोकरी करणारे
सरकारने स्पष्ट केले आहे की 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे खाजगी आरोग्य विमा किंवा कर्मचारी राज्य विमा योजनेत समाविष्ट आहेत तेही आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुमच्या घरात ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे दोन व्यक्ती असतील तर अशा वेळी पती आणि पत्नी दोघांसाठी 5 लाख रुपयांचे समान विमा संरक्षण असेल. याशिवाय जे लोक आधीपासूनच आयुष्मान योजनेचा लाभ घेतात अशा कुटुंबांना एकूण 10 लाख रुपयांचा लाभ दिला जाईल. अहवालानुसार 7.37 कोटी रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना या योजनेंतर्गत लाभ झाला आहे, त्यापैकी 49 टक्के लाभार्थी महिला आहेत. या योजनेंतर्गत सर्वसामान्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक फायदा झाल्याचे सांगण्यात आले आहे.