मुंबई : बाहुबली २ या चित्रपटाने यंदा बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिएफएक्सच्या  प्रभावी वापराच्या मदतीने या चित्रपटातील अनेक सीन्स अंगावट काटा आणतात. 


एका सिनमध्ये प्रभास हत्तीच्या सोंडेवरून चढून पाठीवर बसतो. राजमौलीच्या चित्रपटातील हा सिन खूपच प्रभावी झाला आहे. पण या चित्रपटाच्या एका फॅनने चक्क हा सिन्स इतका गंभीरतेने घेतला की केरळच्या एका जंगलामध्ये त्याने हा प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केला. 



 


प्रभासप्रमाणे ऐटीत चढायला गेलेल्या या फॅनला मात्र हत्तीने धुडकावून लावले.  समोर पडलेला तो मुलगा बराच वेळ निपचित पडलेला दिसत आहे. यावरून सहाजिकच हत्तीचा वेग काय असेल याचा अंदाज तुम्हांला आला असेल.  


सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. युट्युबवर याला  88,857 व्ह्युज मिळाले आहेत.