बाबा रामदेवांना कोणत्याही परिस्थितीत हवी आहे रुचि सोया
रुचि सोयासाठी लावली 4 हजार कोटींची बोली...
नवी दिल्ली : दररोज लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणारी पतंजली आयुर्वेदने दिवाळखोरीत निघालेल्या रुचि सोयाच्या मालकीसाठी 4 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार पतजंलीने कर्जात बुडालेल्या रुचि सोया कंपनीच्या मालकीसाठी बोली लावली होती. सोबतच अडाणी विल्मर , इमामी एग्रोटेक आणि गोदरेज एग्रोवेट यांच्या देखील यामध्ये समावेश आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचा खाद्य तेलच्या रिफाइनिंग आणि पॅकेजिंगसाठी याआधीच रुचि सोया बरोबर करार आहे.
इंदूरच्या रुचि सोया कंपनीवर 12,000 कोटींचं कर्ज आहे. न्यूट्रेला, महाकोष, सनरिच, रुचि स्टार आणि रुचि गोल्ड हे या कंपनीचे इतर ब्रँड आहेत. पतंजलीने रुचि सोयासाठी 4,000 कोटींची बोली लावली आहे. मागीत आठवड्यात पतंजलीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं की, कंपनीने रुचि सोयासाठी बोली लावली आहे. कारण कंपनीला खाद्य तेल आणि विशेषत: सोयाबीन तेलमध्ये एक प्रमुख कंपनी बनायचं आहे. सोबतच कंपनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ इच्छिते. गोदरेज एग्रोवेट आणि इमामी एग्रोवेटने देखील रुचि सोयासाठी बोली लावल्याचं बोललं जातंय.