रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग लोकांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन ताब्यात घेतले. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुजर यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा केली.


काय आहेत दिव्यांगांच्या मागण्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९५ चा अपंग कायदा लागू करण्याची मुख्य मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलीय. या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलीय. पाहुयात काय आहेत त्यांच्या आणखीन काही मागण्या...


दिव्यांगांना महाराष्ट्र सदन घेतलं ताब्यात

 


१. ग्राम पंचायतीपासून ते महानगर पालिकेपर्यंत एकूण बजेटपैंकी ३ टक्के खर्च अपंगांसाठी खर्च करा. आत्तापर्यंत झाला नसला तरी पुढे खर्च करणे सक्तीचं करा... जो करणार नाही त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीय. 


२. पेन्शन योजना अपडेट करा. पेन्शनची रक्कम वाढवण्यात यावी. केंद्र शासनानं ३० रुपये दिले असले तरी राज्य शासनानं त्यातल्या २०० रुपयांचंच वाटप केलं. राज्य शासनाकडून लाभार्थींना १०० रुपये कमी मिळाले, याची चौकशी व्हायला हवी. शिवाय कॅबिनेट बैठकीत पेन्शन वाढविण्याबाबत प्रस्ताव मांडणार असण्याचे आश्वासन राजू शेट्टी यांनी दिलंय.


३. रेल्वे प्रवास अपंगांना सोयीस्कर होईल अशी सोय करा. रेल्वेप्रवास अपंगांसाठी मोफत करा. अशी मागणी करतानाच रेल्वे प्रशासन अपंगाबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय


४. अपंगांसाठी राज्यात एक निवासी विद्यापीठ उभारा

५. शासकीय आणि खाजगी इमारतीत विकलांग सुविधा द्याव्यात. आज सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीतही व्हीलचेअर नव्हती, ही गोष्ट आपण पंतप्रधान कार्यालयाकडे पोहचवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय


६. शिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अपंगांना घर मिळण्याबाबत आणि इतर मागण्यांवर चर्चा झाली.