नवी दिल्ली : तुमचे जर पंजाब नॅशनल बॅंकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पीएनबीने आपल्या 300 शाखांवर नजर टाकली. यात 300 शाखा नजरेत आहेत. जर या शाखांनी आपली स्थिती सुधारली नाही तर या शाखा बंद करण्यात येतील किंवा त्यांचे एकत्रीकरण करण्यात येईल. त्यामुळे तुमचे खाते असलेली शाखा बंद होईल किंवा त्याचे एकत्रीकरण झाल्याने ती शाखा तुमच्या घरापासून दूर असेल.


काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबद्दली पीएनबीचे प्रबंध निर्देशक सुनील मेहता यांनी सांगितले की, नुकसान होत असणाऱ्या सर्व शाखांना नोटीस देण्यात आली आहे की त्यांनी आपल्या स्थितीत सुधारणा करावी. असे न झाल्यास आम्ही ती शाखा बंद करू किंवा त्या मर्ज करू. आमची 300 शाखांवर नजर आहे. मेहता यांनी स्पष्ट केले की, सर्व शाखा तोट्यात नसून काहींमधून कमी नफा निघतो.


बॅंकेच्या देशाबाहेर शाखा


मेहता पुढे म्हणाले की, आम्ही या योजनेवर काम करत आहे. या बॅंकेच्या संपूर्ण देशभरात एकूण 7000 शाखा आहेत. त्याचबरोबर परदेशातही या बॅंकेच्या शाखा आहेत. ऑस्ट्रेलिया आणि चीन मधील कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पीएनबी 9 देशात उपस्थिती आहे. हॉंगकॉंगमध्ये दोन, दुबईमध्ये एक आणि ओबू-मुंबई मध्ये एक शाखा आहे. याशिवाय बॅंकेची लंडन, भुतानमध्ये दोन शाखा आहेत तर नेपाळ, सिडनी, शांगहाए, ढांका और दुबई-यूएई येथे चार प्रतिनीधी कार्यालये आहेत.