Dhirendra Shastri: बागेश्वरने उधळली मुक्ताफळं; संत तुकोबारायांचा केला अपमान
बागेश्वर बाबाच्या या विधानावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबाचा निषेध नोंदवलाय.
Bageshwar On Tukaram Maharaj: अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिलेल्या आव्हानामुळे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा अचानक चर्चेत आले. त्यात आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबानी मुक्ताफळं उधळल्यानं नवा वाद निर्माण झालाय. तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारायची त्यामुळेच ते देव देव करू लागले असं विधान बागेश्वर बाबानी केलंय. काय म्हणालेत बागेश्वर बाबा पाहुयात.
काय म्हणाले बागेश्वर बाबा?
संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा (Dhirendra Shastri) यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला ** वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारे बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसला, असं बागेश्वर (Bageshwar baba) म्हणाले आहेत.
बागेश्वर बाबाच्या या विधानावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबाचा निषेध नोंदवलाय. तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी बागेश्वर बाबाना फटकवण्याचा इशारा दिलाय..
संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलाय. तर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosle) यांनी देखील निषेध नोंदवला आणि माफी मागण्याची मागणी केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरुद्ध बागेश्वर बाबा असा संघर्ष शांत होताना दिसत होता. त्याचवेळी संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी गरळ ओकली. त्यामुळे बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोव-यात सापडलाय.