नवी दिल्ली : बजाज ऑटोचे संस्थापक राहुल बजाज यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर राहुल बजाज हे कार्यकारी भूमिकेत दिसणार नाहीत. बजाज कंपनी पुढे नेण्यासाठी आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी राहुल यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांनी सलग ५० वर्षे कंपनीची सेवा केली.


३१ मार्चला शेवटचा दिवस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार राहुल ३१ मार्च २०२० पर्यंत एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करणार आहेत. राहुल बजाज १ एप्रिल १९७० पासून सलग बजाज ऑटोचे पसंचालक राहीले आहेत. याआधी एप्रिल २०१५ मध्ये कंपनीने त्यांना पाच वर्षांसाठी संचालक नेमले होते.


कार्यभाग कमी करण्यासाठी निर्णय 


राहुल बजाज नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून काम करतील. 2020 एप्रिलपासून ते हे पद स्वीकारतील. यावर बजाज ऑटो यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


कंपनीच्या संचालक मंडळाने बजाज यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीस मान्यता दिली. बर्‍याच वचनबद्धता आणि वाढत्या व्यस्ततेमुळे  कामाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.


वय वर्षे ८१ 


राहुल बजाज यांच्या वयाची ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे ध्यानात ठेवत तसेच सेबी नियमांचे पालन करत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गैर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीवर शेअर धारकांची मंजूरी घेणे गरजेचे आहे.