मध्य प्रदेश : शारदीय नवरात्रोत्सव (navratri) देशभरात साजरा केला जातोय. देशभरात ठिकठिकाणी देवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर गरब्याचेही (Garba) आयोजन केले जात आहे. दरवर्षी सर्वच जण गरब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने गरब्याबाबत (Garba) कडक सूचना जारी केल्या आहेत. गरबा मंडपांमध्ये प्रवेशापासून सुरक्षेपर्यंत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच राज्यातील भाजप (BJP) नेतेही गरब्यात प्रवेश देण्याबाबत सातत्याने भाष्य करत आहेत. (ban Entry in Garba and goods of Muslims in navratri mp pragya singh thakur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (pragya singh thakur) यांनी गरब्यामध्ये प्रवेश देण्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. ओळखपत्र (ID) तपासूनच गरब्यामध्ये (Garba) प्रवेश द्यावा, असे खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (pragya singh thakur) यांनी म्हटलं आहे. मंगळवारी गुजरातमध्ये मंगळवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी (Bajrang Dal workers) मुस्लीम तरुणांना अहमदाबादमधील (Ahmedabad) गरबा (Garba) स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बेदम मारहाण केली. अहमदाबादमध्ये गरबा कार्यक्रमात एका तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, "मुस्लीम समाजाच्या लोकांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये. आम्हाला आमची पूजेची पद्धत शुद्ध ठेवायची आहे. कोणत्याही प्रकारे आमच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये, मुस्लीम समाजाचे मंडप, त्यांनी बनवलेल्या वस्तू आणि त्यांच्या सर्व कामांवर बंदी घातली पाहिजे. त्यांची दुकानेही लावू नयेत."


यापूर्वी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही गरबा ठिकाणाच्या प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे. देवीच्या उपासनेचा सण नवरात्री हे आपल्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले होते. अशा पवित्र प्रसंगी शांतता आणि सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी आयोजकांना ओळखपत्र पाहूनच गरबा कार्यक्रमात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.