चेन्नई :  तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही प्रशासनाकडून बॅनर, फ्लेक्स बोर्ड, साईन बोर्ड लावण्याची परवानगी दिली असेल तर त्याला कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असे आदेश मुख्य सचिवांनी कोर्टाने दिला आहे. 


राज्यातील सर्व भागात स्वच्छ वातावरण असावे यासाठी सर्व भिंतींवरील चित्रांचा तपशील तपासून पाहावा, सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवरील विदृपता कमी करण्यासाठी असलेल्या कायद्याचे पालन करावे असे आदेश कोर्टान दिल आहे. 


न्यायमूर्ती एस वैद्यनाथन यांनी अरूमबक्कम की बी तिरूलोचना कुमारी यांच्या एका याचिकेवर निर्णय देताना हा आदेश दिला. याचिकेत कुमारी यांनी आपल्या घरासमोर पक्षाचे बोर्ड, बॅनर आणि झेंड्यांना हटविण्यासाठी चेन्नई महापालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती.