अनेक बँकांमध्ये बँक अकाऊंट उघडण्याचे तोटे
तुमच्याकडे अनेक बँकांचे बचत खाते आहे का?
मुंबई : तुमच्याकडे अनेक बँकांचे बचत खाते आहे का? कारण सध्या काही नवीन कंपन्या झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडून देत आहे. नोकरी सोडल्यानंतर अनेक बँकांची खाती उघडून झालेली असतात. दुसरी नोकरी सुरू केल्यावर तेथील सेव्हिंग खाते काढावे लागते. खातेधारकांचे असेच अनेक खाते वाढत जातात आणि त्याकडे खातेधारक दुर्लक्ष करतो.
बचत खात्यांना लागून असणाऱ्या अनेक सेवा असतात. जसे क्रेडिट कार्ड, SIP, कर्ज आणि फंन्ड ट्रान्सफर यामुळे खाती बंद करणे राहून जातं. या परिस्थितीत बचत खाती सुरू ठेवणे योग्य आहे का? यात काही तोटा होऊ शकतो का? असा प्रश्न नेहमीच तुम्हाला भेडसावत असतो.. तर याविषयी आणखी सविस्तर जाणून घ्या..
कायद्यानुसार तुम्ही एकापेक्षा जास्त बचत खाती ठेवू शकतात. जर तुमच्याकडे एकाच बँकेचे खाते असेल, तर ते ऑपरेट करायला फार सोपे जाते. तुम्ही जमा केलेली रक्कम एका ठिकाणी असेल, तर आणखी सोईनुसार तुम्ही याचा वापर करू शकता.
प्रत्येक बँकेचे काही वेगवेगळे नियम असतात. जर तुमचे असे अनेक बचत खाते असतील, तर तुमची सहजपणे कोणीही फसवणूक करू शकतो आणि त्याचबरोबर तुमच्या
क्रेडिट स्कोअरवरही याचा प्रभाव पडू शकतो.
एका खात्यातून तुम्ही व्यवहार करत असाल, तर त्या खात्याचा रेकॉर्ड हा चांगला राहतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरवरही याचा चांगला प्रभाव पडतो. याचा तुम्हाला फायदा होतो.
यामुळे तुम्हाला सहजपणे बँक सुद्धा कर्ज देण्यास फार वेळ घेत नाहीत, आणि बँकेची क्रेडीट लिमिटसाठी देखील हे सोयीचं असतं. जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल, तर एक खातं ठेवलं तर ते फायदेशीर असतं, कारण ते वापरायला देखील सोईस्कर असतं.
तुमचे अनेक बँकांमध्ये बचत खाते असेल, तर ते देखील आजकाल फायदेशीर ठरतंय. जर बँकेचा सर्व्हर बंद असेल, तर आपण दुसर्या बँकेच्या बचत खात्याचा वापर करु शकतो आणि आपले काम करू शकतो. किंवा खात्यात काही गडबड असेल, जसे की एटीएम पासवर्ड, पासबूक हरवले असेल, तर तुम्ही दुसऱ्या खात्याचा देखील वापर करू शकता.
बरेच आर्थिक तज्ञ म्हणतात, बँकेत एकच बचत खाते असणं योग्य. मात्र व्यवहारीक दृष्ट्या बघितलं गेलं, तर दोन खाते योग्य आहेत. एक खातं असेल, तर ते एसबीआय सारख्या बँकेचं असणं गरजेचं आहे. ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या बँकचे जास्त एटीएम असतील.