`या` बॅंकांना मिळणार इतके अनुदान!
सरकारी बॅंकांसाठी सरकारने सुमारे एक लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे.
नवी दिल्ली : सरकारी बॅंकांसाठी सरकारने सुमारे एक लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे. वित्तमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. त्याचबरोबर सरकारी बॅंका बुडू न देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार सरकारी बॅंकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकांचे पैसे सुरक्षित राहतील, असे देखील त्यांनी सांगितले.
बॅंकेतील तुमचे पैसे सुरक्षित
बॅंकेत चुकून काही फ्रॉड झाल्यास ग्राहकांना १० दिवसाच्या आत रक्कम परत केली जाईल.
बॅंकांना अकाऊंट ओपन करण्यासाठी अॅप प्रमोट करावे लागेल.
खाताधारकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारने सांगितले.
बॅंकांना त्यांच्या सुविधेत सुधारणा करायला हवी. सेवा-सुविधा सोप्या करायला हव्यात.
सरकारने जाहिर केले...
सरकारी बॅंकांना ८८,१३९ कोटींचे पॅकेज देण्याचे जाहिर केले आहे.
सरकारी बॅंकेत सुधारणा करण्यात येतील.
बॅंकांना गरजेनुसार मदत देण्यात येईल.
बॅंकांना आपल्या नॉन कोर असेटच्या माध्यमातून पैसे कमवायला हवेत.
२५० कोटींपेक्षा अधिक प्रकारच्या लोनवर विशेष लक्ष देण्यात येईल.
बॅंकांना काहीच क्षेत्रात फोकस करण्याचा अधिकार.
मोठ्या रकमेच्या लोनवर विशेष लक्ष
बॅंकांना SME ची ग्रोथ वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील.
रिकपिटलायजेशन बॅंकांना त्यांच्या प्रदर्शनावर अवलंबून राहावे लागेल.
२५० कोटींहुन अधिक रक्कमेच्या लोनवर विशेष लक्ष देण्यात येईल.
मोठ्या कॉर्पोरेट लोनसाठी एक्सपोजर १०% ठेवावे लागेल.
कोणत्या बॅंकेला किती पूंजी मिळेल?
स्टेट बॅंक ऑफ इंडिया- ८८०० कोटी रुपये
पंजाब नॅशनल बॅंक- ५४७० कोटी रुपये
बॅंक ऑफ बडोदा- ५३७५ कोटी रुपये
IDBI बॅंक- १०६१० कोटी रुपये
बॅंक ऑफ इंडिया- ९२३२ कोटी रुपये
युको बॅंक- ६५०७ कोटी रुपये
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया- ५१५८ कोटी रुपये
इंडियन ओव्हरसीस बॅंक- ४६९४ कोटी रुपये
ओरिंटल बॅंक ऑफ कॉमर्स- ३५७१ कोटी रुपये
देना बॅंक- ३०३४ कोटी रुपये
बॅंक ऑफ महाराष्ट्र- ३१७३ कोटी रुपये