मुंबई : ही बातमी सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे. मार्च महिन्यात सलग आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. एवढ्या दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे तुम्ही व्यवहार लवकर करून घ्या. या दिवसांत कोणत्याही प्रकारची काम होणार नाहीत. 


८ मार्च ते १५ मार्चपर्यंत बँका बंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च ते १५ मार्चपर्यंत बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. ८ मार्च रोजी रविवार आहे. त्यानंतर ९ मार्च आणि १० मार्च रोजी होळी आणि रंगपंचमीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र ९ मार्च रोजी होळीच्यी राज्यात सुट्टी नाही. त्यामुळे एक दिवस बँका सुरू राहणार आहेत. 


तसेच सरकारी बँकांच्या युनियन बँक एंप्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एंप्लॉयी असोसिएशन (AIBEA) यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ११ मार्च ते १३ मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तर १४मार्च आणि १५मार्च रोजी दुसरा शनिवार आणि नंतर रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. यानुसार मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच बँकांचा व्यवहार होणार नाहीत. 


25 मार्च रोजी गुढीपाडवा असल्यामुळे त्या दिवशी देखील बँका बंद राहतील.  मार्च महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना नऊ दिवस सुट्टी मिळणार आहे. यामुळे खातेधारकांचा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून येत्या दिवसांमध्ये बँकेशी संबंधित सर्व काम उरकून घ्या. तसेच रोख रक्कम स्वतःजवळ काढून घ्या.