Bank Holiday 2022 : बॅकेत जाण्यापुर्वी `ही` बातमी वाचा..
तुमची बँकेशी संबंधित काही कामं असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यात...
मुंबई: तुमची बँकेशी संबंधित काही कामं असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यात अनेक सण येत असल्याने बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तुम्ही नक्की पाहून घ्या. कारण ऑगस्ट महिन्यात 7 दिवस बँका बंद राहणार आहेत. (August Bank Holiday) त्यामुळे या महिन्यात बँकेशी संबंधित जर काही काम (Working of Bank) असेल तर सुट्टी (Holiday) तपासून बँकेत जा. मात्र ऑनलाइन व्यवहार सेवा Google Pay, फोन पे, पेटीएम, इंटरनेट बँकिंग सेवा (Banking services) सुरू राहतील.
असे असले तरी तुम्ही ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. सणांच्या निमित्ताने ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्ट्या आहेत. यात शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुटी देखील समाविष्ट आहे. बँकेच्या सुट्ट्यांमुळे तुम्ही ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकता. यादीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत.
कोणत्या दिवशी बँका बंद राहतील?
15 ऑगस्ट 2022-स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट 2022 – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट 2022 – जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
21 ऑगस्ट 2022-रविवार
28 ऑगस्ट 2022-रविवार
31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)