Bank Holiday: फेब्रुवारी महिन्यात 8 दिवस बँका बंद, बँकेत जाण्याआधी लिस्ट नक्की वाचा
कोणत्या दिवशी बँका बंद असणार आणि कसं असेल सुट्ट्यांचं टाइम टेबल जाणून घ्या
मुंबई : जानेवारी महिना संपायला शेवटचे 3 दिवस आहेत. महिन्या अखेरीस किंवा नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतात. जर फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाची कामं बँकेत करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 8 दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टीचा दिवस एकदा नक्की तपासून पाहा.
पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यासाठी बँकेचं कोणतंही काम पुढे ढकललं असेल तर जरा थांबा. हे वेळापत्रक पाहूनच आपलं पुढचं नियोजन करा. अन्यथा ज्या दिवशी बँकेत कामासाठी जाणार असाल तेव्हाच नेमकं आपलं काम अडण्याची शक्यता असू शकते. फेब्रुवारी महिन्यात नेमक्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
फेब्रुवारी महिन्यात 8 दिवस बँका बंद
फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या शनिवारी देशातील बँका बंद असणार आहेत. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्तानं 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी आहे. 12 फेब्रुवारीला सोनम लोसार निमित्तानं सिक्कीममधील बँका बंद राणार आहेत. 15 फेब्रुवारीला मणिपूरमध्ये, 16 फेब्रुवारीला वसंत पंचमी निमित्तानं हरियाणा, पंजाब, ओ़़डिशा, त्रिपूरा, पश्चिम बंगालमध्ये बँका बंद असणार आहेत.
20 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील बँकांना सुट्टी असणार आहे. 26 फेब्रुवारीला हजरत अली जयंती निमित्तानं उत्तर प्रदेशातील बँकांना सुट्टी असेल. 27 फेब्रुवारीला गुरु रविदास जयंतीमुळे चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील बँका बंद राहणार आहेत.
इंटरनेट बँकिंनद्वारे करू शकता काम
फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या सणानिमित्तानं 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे शाखा बंद असली तरी आपली कामं इंटरनेट बँकिंगद्वारे करता येणार आहेत. प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्यांचं नियोजन आणि शेड्युल वेगवेगळ आहे. त्यामुळे ते पाहूनच ग्राहकांनी बँकेत आपल्या कामासाठी जावं असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलं आहे.
2021 संपूर्ण वर्षात बँकाना 40 दिवस सुट्टी
1 फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोनाच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे काय नवीन बदल असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)वर्षभरातील सुट्टीच्या यादीनुसार यावर्षी बँका 40 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. रविवार वगळता बँका महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहणार आहेत.