ऑगस्ट महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार
बँकांच्या सुट्टीची यादी पाहून घ्या
मुंबई : श्रावण सुरू झाला की, अनेक सणांना सुरूवात होते. ऑगस्ट महिन्यात सणांची रेलचेल सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. हे दिवस लक्षात घेऊन नागरिकांनी आपली बँकेतील सर्व महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल करण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्यात बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका असे सण या महिन्यात येणार आहेत. तसेच या महिन्यात पाच रविवार देखील आहेत. त्याचप्रमाणे ८ आणि २९ ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार येणार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यात येणार सुट्टया
१ ऑगस्ट शनिवारी बकरी ईद
३ ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन
११ ऑगस्ट मंगळवार गोकुळाष्टमी
१२ ऑगस्ट बुधवार गोकुळाष्टमी
१५ ऑगस्ट शनिवारी स्वातंत्र्य दिन
२१ ऑगस्ट शुक्रवार तीज-हरतालिका
२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी
३० ऑगस्ट रविवार मोहरम
३१ ऑगस्ट सोमवार ओनम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँक हॉलिडेनुसार ऑगस्ट महिन्यात चंदीगड, पणजी आणि गंगटोकमध्ये सोडून इतर शहरात बँका बंद राहणार आहेत.