मुंबई : नेट बँकिंगच्या अडचणी असो किंवा चेक एटीएमची सेवा तुमचं कोणतं बँकेतील काम अजूनही पेंडिंग असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँक बंद राहणार आहे. तुमची बँकेची रखडलेली काम ऑक्टोबरमध्ये करायची आहेत, तर बातमी नक्की वाचा. येत्या ऑक्टोबर 2021 महिन्यात नवरात्र आणि दसरा असल्यामुळे या उत्सवात 21 दिवस बँक बंद (Bank holiday in October) राहणार आहे. जर तुम्हची महत्त्वाची बँकेची काम असतील तर ती आताच करून घ्या.  


21 दिवस बंद राहणार बँक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिजर्व  बँकने दिलेल्या माहितीनुसार (RBI) 21 दिवस बँक बंद राहणार आहे. देशातील सर्वचं बँक बंद नसतील कारण RBIच्या वतीने काही सुट्ट्या या राज्यांच्या सणानुसार दिल्या जातात. तर शनिवार रविवार देखील असल्याने बँका बंद राहातील. यादरम्यान देशामधील काही शहरांमध्येही बँक बंद राहणार आहे.  या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेष आहे.  RBIच्या गाईडलाईन्सनुसार, रविवारसोबत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असतात.  


कोणत्या दिवशी बँक राहणार बंद ?


RBIच्या अहवालानुसार, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे बँक बंद असणार आहे. तर पाठोपाठ 3 ऑक्टोबरला लगेचचं रविवार आहे.  15 ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे  बँकेचं कामकाज बंद राहील. तर 19 रोजी ईद-ए-मिलादलची सुट्टी असेल आणि महिन्याच्या आखेरीस 31 ऑक्टोबरला बँक बंद राहणार आहेत.


पाहा सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट:


1ऑक्टोबर - गंगटोकमध्ये अर्ध्या वार्षिक बँक क्लोजिंग अकाउंटमुळे बँक बंद
2 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती ( सर्व राज्यात  बँक बंद )
3 ऑक्टोबर- रविवार
6 ऑक्टोबर-  बंगलोर आणि  कोलकातामध्ये बँक बंद
7 ऑक्टोबर- इंफाळमध्ये बँक बंद असतील.
9 ऑक्टोबर- शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार )
10 ऑक्टोबर- रविवार
12 ऑक्टोबर-दुर्गा पूजा (महासप्तमी) – अगरतला, कोलकातामध्ये  बँक बंद
13 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महाअष्टमी) – अगरतला, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना  आणि रांचीमध्ये बँक बंद असतील.
14 ऑक्टोबर- दुर्गा पूजा / दसरा (महानवमी) / आयुथ पूजा- अगरतला, बेंगळुरु, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग आणि  तिरुवनंतपूरममध्ये बँक बंद असतील.
15 ऑक्टोबर- दुर्गा पूजा / दसरा  / विजयादशमी- इंफाळ आणि शिमला सोडून बँक बंद असतील.
16 ऑक्टोबर-दुर्गा पूजा - गंगटोकमध्ये बँक बंद
17 ऑक्टोबर- रविवार
18 ऑक्टोबर-कटी बिहू- गुवाहाटीमध्ये बँक बंद
19 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी / मिलाद-ए-शरीफ / -अहमदाबाद, बेलापूर, भोपाल, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नई दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर  आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद
20 ऑक्टोबर-लक्ष्मी पूजा / ईद-ए-मिलाद- अगरतला, बंगळुरू चंडीगढ़, कोलकाता आणि शिमलामध्ये बँक बंद
22 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद
23 ऑक्टोबर- शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार )
24 ऑक्टोबर- रविवार
26 ऑक्टोबर-जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद
31 ऑक्टोबर- रविवार