मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेत लवकर कामे आटपून घ्या. RBI नं 'Holiday under Negotiable Instruments Act' अंतर्गत सप्टेंबर महिन्यातील बँक हॉलिडे ठरवले आहेत. यामध्ये चार रविवार आणि दुसरा आणि चैथा रविवार असून वेगवेगळ्या राज्यांतील सण-उत्सव, धार्मिक समारंभांचा विचार करुन सुट्ट्यांचा समावेश केला आहे.  RBI च्या अधिकृत यादीनुसार,  देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांतील सणानुसार सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात हे 12 दिवस बँका बंद राहणार आहेत
- 5 सप्टेंबर : रविवार
- 8 सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेव तिथी 
- 9 सप्टेंबर : हरितालिका - 
- 10 सप्टेंबर : गणेश चतुर्थी  
- 11 सप्टेंबर : दुसरा शनिवार / गणेश चतुर्थी 
- 12 सप्टेंबर : रविवार
- 17 सप्टेंबर : कर्म पूजा 
- 19 सप्टेंबर : रविवार
- 20 सप्टेंबर : इंद्रजत्रा 
- 21 सप्टेंबर : श्री नारायण गुरु समाधी दिवस
- 25 सप्टेंबर : चौथा शनिवार
- 26 सप्टेंबर : रविवार


महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 5, 10, 11, 12, 19, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहे. याशिवाय दुसरा आणि चौथा रविवार आणि दुसरा, चौथा शनिवारी RBI च्या नियमानुसार बँका बंद असणार आहेत.