मुंबई : मार्च महिना हा बँकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. हाच मार्च महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्षाचा लेखाजोख्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र याच मार्चमध्ये यंदा बँक कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा आहे. मार्चमध्ये बँकां एकूण 13 दिवस बंद (Bank Holidays March 2022) असणार आहेत. या 13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारासह रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. (bank holidays march 2022  banks are closed total 13 days in march month check list of bank working days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चमध्ये महाशिवरात्री, होळी, या आणि यासारखे अनेक सण असतात. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतील. मात्र खातेधारकांनी ही बाब लक्षात ठेवावी की देशाभरातील सर्व बँकांना 13 दिवस बंद नसतील. 


मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात विशेष सण असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात त्या त्या सणानुसार बँका बंद असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात मार्च महिन्यात बँका बंद राहण्याचे दिवस हे कमी-जास्त प्रमाणात असू शकतात. त्यामुळे खातेधारकांनो ऐनवेळेस गैरसोय टाळण्यासाठी बँका मार्चमध्ये केव्हा बंद राहणार हे जाणून घ्या.  
 
मार्च महिन्यात कधी बँका बंद राहणार


1 मार्च | महाशिवरात्रि
3 मार्च | लोसर (गंगटोकमध्ये बँक बंद असणार)
4 मार्च | चापचर कुट (मिझोराममध्ये बँक बंद )
6 मार्च | रविवार
12 मार्च | दुसरा शनिवार
13 मार्च |रविवार
17 मार्च | होलिका दहन (डेहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीत बँका बंद राहणार
18 मार्च | धुळीवंदन
19 मार्च | होळी (भुवनेश्वर, इंफाल, पटना बँक बंद)
20 मार्च | रविवार
22 मार्च | बिहार दिवस (पाटण्यात बँका बंद)
26 मार्च | चौथा शनिवार
27 मार्च | रविवार