मुंबई : खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात 4 एप्रिलपर्यंत फक्त दोन दिवसच बँका सुरु असणार आहेत. 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान फक्त 2 दिवस बँका सुरु राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर ते वेळेत करुन घ्या. अन्यथा तुम्हाला काही दिवस थांबावे लागेल. 27 ते 29 मार्च दरम्यान देशभरातील बँका सलग तीन दिवस बंद राहतील. दरम्यान, 30 मार्च आणि 3 एप्रिल रोजी केवळ दोन दिवस बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने 31 मार्च रोजी बँकिंग सेवा उपलब्ध होणार नाहीत.


27 मार्च - शनिवार
28 मार्च - रविवार
29- होळीची सुट्टी

30 मार्च - बँक सुरु राहिल
31 मार्च - वर्षाचा शेवटचा दिवस
1 एप्रिल - क्लोजिंग अकाउंट

2 एप्रिल - गुड फ्रायडे
3 एप्रिल - शनिवार - बँक सुरु राहिल
4 एप्रिल - रविवार


काही राज्यांमध्ये बँक सुट्टी बदलू शकते. आरबीआय कॅलेंडरनुसार, चार रविवार आणि दोन शनिवार वगळता देशभरात राजपत्रित सुटीच्या दिवशी बँका बंद राहतील. महत्त्वपूर्ण म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये जाहीर केलेल्या आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 मार्च रोजी झालेल्या दोन दिवसांच्या बँक संपामुळे या कामावर परिणाम झाला.