HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Bank News : दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार असो किंवा मग एखाद्या मोठ्या व्यवहारासाठी केलेली आर्थिक देवाणघेवाण असो. बँकांची मदत पावलोपावली होत असते. एखाद्या मोठ्या व्यवहारांमध्ये अडचणी आल्यास हीच बँक आपल्या आर्थिक गरजासुद्धा भागवते. अशा या बँकांकडून पुरवली जाणारी आणखी एक सुविधा म्हणजे Card Payment.
एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. याच क्रेडिट कार्ड पेमेंट अर्थात क्रेडिट कार्डनं आर्थिक व्यवहार केल्या जाण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याच्या हेतूनं एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि एसबीआयनं काही नियमांमध्ये बदल केले आहेत. तुम्हाला हे नियम माहित आहेत का? (Bank News Credit Card Rules)
जास्त पैसे मोजावे लागणार?
तुम्ही क्रेडिट कार्डनं भाडं भरत असाल तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या नियमानुसार या व्यवहारांमध्ये आता 1 टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. शिवाय परदेशात तुम्ही भारतीय चलनाचा वापर करून एखाद्या नोंदणीकृत भारतीय दुकानात पैसे भरत असाल तर, त्यावरही तुम्हाला 1 टक्के अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. 5 मार्च 2024 पासून हा नियम लागू झाला आहे.
एसबीआय (SBI) कडून आता किमान रकमेसंदर्भातील नियम बदलणार असून, नवा नियम 15 मार्चपासून लागू होणार आहे. तर, ICICI बँकेडकून एअरपोर्ट लाऊंजसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून हा नवा नियम लागू होत असून, त्यानुसार तुम्ही मागील तिमाही (जानेवारी- फेब्रुवारी-मार्च 2024) मध्ये 35000 रुपये खर्च केला असेल तर पुढील तिमाही (एप्रिल-मे-जून 2024) मध्ये तुम्हाला एअरपोर्ट लाऊंजचा फ्री अॅक्सेल अर्थात मोफत प्रवेश असेल.
हेसुद्धा वाचा : अरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?
HDFC कडून रेगलिया आणि मिलेनिया क्रेडिट कार्ड धारकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. रेगलिया कार्डधारकांसाठीच्या लाऊंज अॅक्सेसचा नियम 1 डिसेंबर 2024 ला बदलण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार हा अॅक्सेस कार्डवरून केल्या जाणाऱ्या खर्चावर आधारिक आहे. तर, मिलेनिया कार्डधारकांनाही तीन महिन्याच्या खर्चाच्या आधारे एअरपोर्ट लाऊंजचा अॅक्सेस देण्यात आला आहे.