Banks Transfer Policy: बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यपद्धती असो किंवा केंद्रानं बँकांच्या कार्यपद्धतींमध्ये केलेले धोरणात्मक बदल असो. याचा थेट परिणाम खातेधारकांवही होताना दिसता. आता पुन्हा एकदा याच बँक कर्मचाऱ्यांसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांमध्ये (Transfer Policy) नव्यानं बदल केले जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्रालयानं एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSB) कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये काही बदल करण्याची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय मंडळाकडून मान्यता मिळाल्यानंतर हे नवे नियम 2026 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येतील असंही अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


ड‍िपार्टमेंट ऑफ फाइनेंश‍ियल सर्व‍िसेज (department of financial services) नं सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना एक पत्र लिहित ट्रान्सफर पॉलिसीसंदर्भात समीक्षण केलं आहे. बदल्यांचं हे धोरण अधिक पारदर्शी करण्यासाठी हे नवे बदल मदत करतील असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. या बदलांमध्ये बदली प्रक्रिया स्वयंचलित अर्थात ऑटोमॅटिक पद्धतीनं करत त्यासाठी गरजेचं असणारी ऑनलाईन प्रक्रिया आखत कर्मचाऱ्यांना बदलीचं ठिकाण निवडण्याची सुविधा देण्याचाही समावेश आहे. 


हेसुद्धा वाचा : पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा 


कर्मचाऱ्यांवर कसा होईल परिणाम... 


पत्रात नमूद केलेल्या संदर्भांनुसार महिला कर्मचाऱ्यांना शक्य असेल तिथवर घरापासूनच्या जवळच्या ठिकाणी, रेल्वे स्थानक किंवा इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये बदली द्यावी. बँकांकडूनच बदलीची ही प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना त्यांची बदली नेमकी का आणि कशी केली जाणार आहे याचीसुद्धा माहिती दिली जाणार आहे.