मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ इंडिया(Bank of India)ने एमसीएलआरआधारित(MCLR) व्याजदरात वाढ केलीये. यामुळे बँकेकडून होम लोन, कार लोन आणि अन्य कोणत्याही प्रकारचे लोन घेणाऱ्यांना आता यापेक्षा अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेली व्याजदरातील वाढ १० जूनपासून लागू होणार आहे. याआधी एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षाच्या अवधीसाठी एमसीएलआर वाढवून ८.५० टक्के करण्यात आलाय तर एका दिवसाच्या अवधीसाठी एमसीएलआर ०.१० टक्क्यांनी वाढवून ७.९० टक्के करण्यात आलाय. याप्रकारे एक महिना आणि तीन महिन्यांच्या अवधीसाठी एमसीएलआर ०.१० टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे ८.२० आणि ८.३० टक्के करण्यात आलाय. सहा महिन्यांसाठीच्या अवधीसाठी एमसीएलआर वाढवून ८.४५ टक्के इतका करण्यात आलाय. सध्या हे दर ८.३५ टक्के इतके आहेत. बँकने वाढ करण्यात आलेले हे नवे दर १० जून २०१८ पासून लागू होतील.


याआधी एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरमध्ये ०.१ टक्क्यांची वाढ केली होती. एसबीआयने तीन वर्षांच्या अवधीसाठी व्याजदरात ०.१० टक्क्यांची वाढ केलीये. एसबीआयच्या वेबसाईटनुसार एसबीआयने एक दिवस आणि एक महिन्याच्या अवधीसाठी एमसीएलआर ७.८ टक्क्यांनी वाढून ७.९ टक्के केलाय. तर तीन वर्षांच्या अवधीसाठी हा व्याजदर ८.३५ टक्क्यांनी वाढवून ८.४५ टक्के केलाय.