Bank Recruitment 2023: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेने 15 हजारांपेक्षा जास्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून बॅचलर डिग्री मिळवलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती


IDBI Recruitment 2023 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IDBI बँकेने एकूण 2100 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड 'O' पदासाठी एकूण 800 रिक्त जागा आहेत आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) (कराराच्या आधारावर) पदासाठी एकूण 1300 रिक्त जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.


अर्ज कधीपासून करु शकतो - 22 नोव्हेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीक - 6 डिसेंबर 2023
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकासाठी ऑनलाइन चाचणी - 31 डिसेंबर 2023
एक्झिक्युटिव्ह पदासाठी ऑनलाइन चाचणी: 30 डिसेंबर 2023


SBI CBO Recruitment 2023


स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (SBI CBO) भरती 2023 मोहिमेद्वारे एकूण 5280 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 22 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली, असून 12 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. SBI CBO भरती परीक्षा जानेवारी 2024 मध्ये घेतली जाईल. 21 ते 30 वयोगटातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.


SBI Clerk Recruitment 2023


एसबीई लिपिक भरती 2023 द्वारे कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदांसाठी एकूण 8283 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 3515 पदे, ओबीसीची 1919 पदे, ईडब्ल्यूएसची 817 पदे, अनुसूचित जातीची 1284 पदे आणि एसटी प्रवर्गातील 748 पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.