Bank Strike on 19th November: बँकेशी संबंधित कोणतंही लहानमोठं काम करण्याच्या प्रतीक्षेत तुम्ही असाल, तर आता वाट पाहण्यात जास्त वेळ दवडू नका. किंबहुना आज- उद्यामध्येच ही कामं उरकून घ्या. कारण, 19 नोव्हेंबरला बँकेच्या व्यवहारांमध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थोडक्यात या दिवशी बँक (Banking) आणि ATM या सुविधांच्या कामकाजात अडथळा येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर दिवशी बँक कर्मचारी संपावर ( Bank Employees On Strike)  जाणार असल्यामुळे (Banking Services) या अडचणी उदभवणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशननं दिलेल्या संपाच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर हे  पाऊल कर्मचारी उचलताना दिसणार आहेत. देशभरातील बँक कर्मचारी संपावर असल्यामुळं 19 नोव्हेंबरला देशातील सर्व बँकांचं काम ठप्प असणार आहे. 


सर्वसामान्यांवर परिणाम... 


संपाच्या दिवळी बँकेच्या कामात व्यत्यय येणार नाही, अशी हमी देत बँकांनी आपल्याकडून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली असली, तरीही यामध्ये कर्मचारी संपावर गेले असता काही प्रमाणात का होईना व्यवहारांवर याचा परिणाम होतो हे नाकारता येत नाही. 19 तारखेला शनिवार आहे, सहसा या वारी बँकांना सुट्टीही असते. पण, हा या महिन्यातील तिसरा शनिवार असल्यामुळं त्याचे थेट परिणाम सर्वसामान्यांनाही भोगावे लागतील असं म्हणायला हरकत नाही. 


Bank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा 


 


संप शनिवारी, त्यानंतरचा रविवार म्हणजे बँक कर्मचाऱ्यांची आठवडी सुट्टी. अशा परिस्थितीत तुमच्या हाती बँकेचं एखादं काम असेल, तर आताच ते पूर्ण करा. कारण, कामं ताटकळत ठेवल्यास थेट सोमवारपर्यंत तुम्हाला प्रतीक्षेत राहावं लागू शकतं.