लॉकरमधील वस्तुंसाठी बँक जबाबदार नाही-आरबीआय
आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हात वर केलेत.
मुंबई : बँकेच्या लॉकरमध्ये जमा करण्यात आलेल्या किंमती वस्तूंची चोरी झाल्यास अथवा काही दुर्घटना झाल्यास बँक जबाबदार नसेल अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.
आरटीआय कार्यकर्ते कुश कालरा यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना बँकेतील लॉकरला बँक जबाबदार राहणार नाही अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारी क्षेत्रातील 19 बँकांनी दिलीय.
आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हात वर केलेत.