मुंबई : नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे. यावेळी, ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही जास्त सुट्या असणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात या वेळी बँकांना १५ दिवसांची सुट्टी असेल. ही सुट्टी राजपत्रित, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि स्थानिक सुटींमुळे असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद  असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात.


ही सुट्टीची संपूर्ण यादी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे आम्ही आरबीआयच्या म्हणण्यानुसार सुट्टीची संपूर्ण यादी देत आहोत.


तारीख

वार

सुट्टी

तपशील

१ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

६ नोव्हेंबर

शुक्रवार

वांगला महोत्सव

स्थानीय सुट्टी

८ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

१४ नोव्हेंबर

शनिवार

दिवाली अमावस्या (लक्ष्मी पूजन) / काली पूजा

गजटेड सुट्टी

१५  नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

१६ नोव्हेंबर

सोमवार

दिवाली (बळी प्रतिपदा) / लक्ष्मी पूजन / भाई दूज/ चित्रगुप्त जयंती / विक्रम संवत नवीन वर्ष दिवस

स्थानीय सुट्टी

१७ नोव्हेंबर

मंगळवार

लक्ष्मी पूजन / दीपावली / निंगोल चक्कौबा

स्थानीय सुट्टी

१८ नोव्हेंबर

बुुधवार

लक्ष्मी पूजा / दीपावली

स्थानीय सुट्टी

२० नोव्हेंबर

शुक्रवार

छठ पूजा

स्थानीय सुट्टी

२१ नोव्हेंबर

शनिवार

छठ पूजा

स्थानीय सुट्टी

२२ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

२३ नोव्हेंबर

सोमवार

सेंग कुत्सनम

स्थानीय सुट्टी

२८ नोव्हेंबर

शनिवार

चौथा शनिवार

चौथा शनिवार

२९ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

३० नोव्हेंबर

सोमवार

गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा / रहासा पौर्णिमा

गजटेड सुट्टी


या सेवा उपलब्ध राहतील



तथापि, आपण सुट्टीच्या दिवसांतही मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे बँकिंग व्यवहार करू शकता. या सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. तथापि, चेक क्लिअरिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.