नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.'हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समीट' या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच डाळीचा किस्सा घडला, ओबामा यांनी हा मजेशीर किस्सा शेअर केला आहे.


ओबामांनी सांगितलेला मजेशीर 'किस्सा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बराक ओबामा यांनी सांगितलं, रात्री जेवणात एका वेटरनं काही खाद्यपदार्थ माझ्या ताटात वाढले. त्यात इतर पदार्थांसह डाळ देखील होता. पदार्थ ताटात वाढल्यानंतर डाळ म्हणजे नेमकं काय ? हा पदार्थ कसा करतात? याबद्दल वेटरने मला सांगायला सुरूवात केली.


बराक ओबामांसमोर 'डाळ शिजली' का?


कदाचित एका अमेरिकन माणसाला डाळ म्हणजे काय, हे माहिती नसावं, असा बिचाऱ्याचा समज झाला असावा, असं म्हणत बराक ओबामा म्हणाले, मला डाळ या पदार्थाबद्दल फक्त माहितीच नाही, तर तो डाळ कशी बनवतात, याची देखील मला माहिती आहे. 


बराक ओबामांची सिक्रेट रेसिपी


यापुढचा आणखी एक धक्का म्हणजे बराक ओबामा म्हणाले, 'मी स्वत: डाळ बनवतो आणि ती कशी करतात, याची सिक्रेट रेसिपीदेखील माझ्याकडे आहे'.


कॉलेजच्या दिवसापासून तिची आणि ओबामांची ओळख


डाळीची पाककृती मी माझ्या भारतीय मित्राकडून विद्यार्थीदशेत असताना शिकलो होतो, तेव्हा तो आणि मी एकाच खोलीत राहायचो, असंही ओबामा यांनी स्पष्ट केलं.